Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साकळी येथे पायी जाणाऱ्या मजुरांची ग्रामस्थांकडून व्यवस्था !

यावल प्रतिनिधी । देशात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर परगावी गेलेले मजूरासह कुटुंब गावाकडे येण्यासाठी कोणतेही वाहन मिळत नसल्याने पायी गावाकडे येत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील साकळी येथील ग्रामस्थांकडून पायी जाणाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

देशात कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असताना १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलेली आहे. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करण्यासाठी आपल्या राज्यात व बाहेर राज्यात अनेक नागरिक गेले आहे. दरम्यान आता कोरोना विषाणूच्या पार्शभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असतांना बाहेरील मोलमजुरी करणाऱ्याना आपल्या गावाकडे जाण्यासाठी कुठलेच वाहन व साधन नाही. असे असतांना अनेक मजूर हे आपल्या गावी जाण्यासाठी पायी निघालेले आहेत. २ एप्रिल रोजी साकळी येथील भाजपचे कार्यकर्ते शेतात जात असताना त्यांना काही पुरुष, महिला व लहान मूल पायी जात असताना दिसले. त्यांनी जि.प. शिक्षण समिती सभापती रवींद्र पाटील यांना संपर्क साधून त्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करता येईल का? अशी विचारणा केली असता. तात्काळ सभापती रवींद्र पाटील यांनी साकळी येथील सक्रीय कार्यकर्ते व भाजपचे शहर अध्यक्ष नितीन तेली ( टेलर) यांच्याशी संपर्क साधून वाटसरू मोलमजुरांच्या कुटुंबांसाठी जेवणाची व्यवस्था करून राहण्याची व जेवनाची व्यवस्था केली. यावेळी भाजपा कार्यकर्ते डिगंबर ठाकूर, सचिन कोळी, रोहित कोळी, सागर महेश्री, मिलिंद जंजाळे, नाना भालेराव, आकाश न्हावी, विकी तेली आदींनी त्यांना सहकार्य केले.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version