साकळी येथे कोरोना योध्द्यांचा ‘वीर-२०२०’ पुरस्कारांने गौरव !

यावल प्रतिनिधी । कोराना विरूध्दच्या लढाईत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लोकहितासाठी सर्व सामान्यांचे महामारीपासून संरक्षण करण्यासाठी सर्वच कोराना योध्दे लढत आहे. जि.प.शिक्षण, आरोग्य व क्रीडा सभापती रविंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्दांचा ‘वीर-२०२०’ पुरस्कारने गौरव करण्यात आले.

संपूर्ण जगासह सद्यस्थितीत गेल्या पाच महिन्यांपासून संपूर्ण देशभरात कोरोना विषाणुसंसर्ग आजाराच्या जागतिक महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे व त्यामुळे देशात व राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. तथापि कोरोना विरुद्धच्या लढाईत स्वतःच्या जीवाची बाजी लावून लोकहितासाठी व सर्वसामान्यांचे महामारी पासुन सरंक्षण करण्यासाठी सर्वच कोरोना योध्दे लढत आहे. तेव्हा ही सर्व आपातकालीन परिस्थिती लक्षात घेता जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण, आरोग्य व क्रीडा सभापती रविंद्र सूर्यभान पाटील यांचा ४६ व्या वाढदिवस २६ जुलै रोजी त्यांच्या हितचिंतक व मित्रपरिवाराकडून कोरोना योद्ध्यांना समर्पित अशा पद्धतीने साजरा करण्यात आला.

सभापती रविंद्र सुर्यभान पाटील वाढदिवसाचे औचित्य साधून जि.प.सभापती रविंद्र पाटील मित्रपरिवार व कै. चंद्रभान आप्पा प्रतिष्ठान तर्फे भवानी माता म्हणून कार्यालयात आयोजित सत्कार कार्यक्रमात कोरोना आजारा विरुद्धच्या लढाईत साकळी-दहीगाव गटातील आरोग्य, महसूल, ग्रामपंचायत, पोलीस, होमगार्ड, प्रसिद्धीमाध्यमे या सर्व विभागातील कर्मचारी व पत्रकार तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका या सर्वांनी आपल्या जिवाची पर्वा न करता आपण स्वतः काळजी घेत समाजाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी दिवस-रात्र अविरत सेवा बजावली त्या बद्दल या सर्व कर्मचाऱ्यांनी व आदीनी केलेल्या उल्लेखनिय कार्यासाठी कै. अण्णासो सूर्यभान हिरामण पाटील व कै. आप्पासो चंद्रभान हिरामण पाटील यांचे स्मरणार्थ कोरोना वीर-२०२० या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यांची होती उपस्थ्‍िाती
याप्रसंगी यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर, गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, साकळीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती कवडीवाले, जि.प. सभापती रविंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. सूर्यभान आण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर कोरोना योध्दांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात कोरोना आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सोशल डिस्टंसिंग चे काटेकोरपणे पालन करण्यात आलेल्या होते. कार्यक्रमास गावातील पदाधिकारी व हितचिंतक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संजय पाटील व श्याम पाटील यांनी केले.

यांना दिला पुरस्कार
या दिवशी सायंकाळी यावल येथे सभापती रवींद्र पाटील यांच्याहस्ते यावल येथील पत्रकार डी.बी.पाटील, राजु कवडीवाले, अय्युब पटेल, अरूण पाटील, शेखर पटेल, सुरेश पाटील, सुनिल गावडे, चंद्रकांत नेवे, ज्ञानदेव मराठे, तेजस यावलकर, पराग सराफ आदी तालुका पत्रकार प्रतिनिधींचा ‘कोरोना वीर-२०२०’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Protected Content