Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साकळी येथील ट्रॅक्टर अपघातप्रकरणी चालकास सहा महिन्याची शिक्षा

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथे भरधाव ट्रॅक्टरच्या अपघातात झालेल्या मृत्यूप्रकरणी ट्रॅक्टर चालक प्रकाश भिमसिंग बारेला यास न्यायालयाने सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, साक्री येथील डांभुर्णी रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टर चा 17 एप्रिल 2017 रोजी अपघात झाला होता या अपघातात सुकलाल लालसिंग बारेला हा ट्रॅक्टरखाली दबल्याने त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान याप्रकरणी चालक प्रकाश भिमसिंग बारेला याच्या विरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने ट्रॅक्टर चालक प्रकाश भिमसिंग बारेला यास सहा महिन्याची शिक्षा व तीन हजार रुपये दंड सूनावला असून अपघातात मृत  झालेल्या सुकलाल बारेला यांच्या वारसास पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

Exit mobile version