Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साकळी-दहीगाव गटात विकास कामांचे भूमिपूजन (व्हिडिओ)

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातीत साकळी येथील जिल्हा परिषदच्या शिक्षण व आरोग्य सभापती  रविंद्र सुर्यभान पाटील यांच्या विकास निधीतून साकळी- दहिगाव गटात ५२ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले.

विरावली गावासाठी वार्ड क्र ३ मध्ये  पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे  भूमिपूजन रविन्द्र उर्फ छोटू पाटीलच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. या वेळी त्यांच्या सोबत सकाळीचे पीक सवरक्षणंचे चेअरमन दीपक पाटील, माजी सरपंच मुसेखा इसेखा पठाण, साहेबराव बडगुजर, सलीम शेख  आदीची उपस्थित होते.

वार्ड क्र ३ विरावली मधील ग्राम पंचायत सदस्य ऍड. देवकांत बाजीराव पाटील, शोभा युवराज पाटील, हमीदा टेनू तडवी, माजी ग्राम पंचायत सदस्य पवन पाटील, रणधीर पाटील, रंगुबाई तडवी यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी विकासकांमच्या भूमीपूजना प्रसंगी गावातील कैलास पाटील, गोरख पाटील,  गणेश पाटील, दगडू तडवी, बाळू पाटील, संजू तडवी, राजेश अडकमोल, हर्षल धनगर, दशरथ पाटील, खगेश पाटील,  हिरामण पाटील, नरेंद्र निळे, संभाजी पाटील, शरद पाटील, रमेश तडवी, प्रदीप पाटील,  दिलीप निळे, मोहित पाटील, धिरज पाटील, संजू पाटील, राजेश पाटील, ईश्वर पाटील, बापू अजलसोंडे, सुमेरसिंग पाटील, दर्पण पाटील, राहुल पाटील, दिनेश फुलपगारे आदी उपस्थितीत होते.  याप्रसंगी सूत्रसंचालन ऍड. देवकांत पाटील यांनी  तर प्रास्ताविक पवन पाटील  यांनी आभार मानले.

 

 

 

Exit mobile version