Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साई मोरया ग्रुपतर्फे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

rajumama

जळगाव प्रतिनिधी । खोटेनगर परिसरातील साई मोरया ग्रुपतर्फे शिवजयंतीनिमित्त खोटे नगर स्टॉपवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन आमदार राजुमामा भोळे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करून केले.

आयोजित केलेल्या शिबीरात ३२ युवकांनी रक्तदान केले. याप्रसंगी प्रभागाचे नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील, साई मोरया ग्रुपचे मार्गदर्शक राजेश जाधव, प्रमोद चौधरी यांची उपस्थिती होते. यशस्वीतेसाठी हितेश पाटील, विलास कुमावत, सागर बोरसे, प्रसन्न जाधव, अजय मोरे, विवेक करपे, सौरभ कदम, धिरज पाटील, निखिल पाटील, सोहम आमोदकर, मंथन इशी यांनी परिश्रम घेतले. शिबिरासाठी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीचे मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version