Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साई मोरया गृप गणेशोत्सव मंडळातर्फे श्री गणेशाला ५६ प्रकारचा भोग

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | खोटे नगर येथील साई मोरया गृपच्या वतीने मागील २० वर्षांपासून श्री गणेशाची स्थापना करण्यात येत आहे.  गृपचे हे एकविसावे वर्ष असून गृपतर्फे आज मंगळवार दि. ६ सप्टेंबर रोजी ५६ भोगाचे नावैद्य दाखवून अथर्वशीर्षचे सामुहिक पठन करण्यात आले.

 

साई मोरया गृपच्या वतीने गणेश उत्सवानिमित्ताने विविध सामाजिक व धार्मिक उप्रकम राबविण्यात येत आहेत. आज ५६ भोगाचे नावैद्य दाखवण्यात आले. तसेच  अथर्वशीर्षचे सामुहिक पठन करण्यात आले. साई मोरया ग्रुप गणेशोत्सव मंडळ  व तालुका पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबविले जातात. यात मूर्ती संकलन,  परिसरातील पाच दिवस, सात दिवसाचे व शेवटच्या दिवशीही गणपती मूर्ती संकलन केले जाते. त्या मूर्तीचे विधिवत पूजन करून विसर्जन केले जाते.

प्रत्येक वर्षी परिसरातील ज्ञान प्रबोधिनी क्लासेस, स्कॉलर ऍकेडमी, गुणवत्ता कोचिंग क्लासेस, महाजन क्लासेस, जीवराम नगर परिसर, हिराशिवा कॉलनी परिसर, सुरक्षा नगर परिसर, विश्राम नगर परिसरासह गणेश मंडळाच्या मुर्तीसह घरातील सुमारे ७००  ते ८००  मूर्तीचे संकलन होते.  याबरोबरच विविध समाज प्रबोधन कार्यक्रम, अथर्वशीर्ष पठण, छप्पनभोग यासह मुलांमुलींसाठी व महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन केले जाते.

गणेशोत्सव दरम्यान वृक्षारोपण, पर्यावरण बचाव, सापांच्या बाबतीत समज गैरसमज, राष्ट्रीय एकात्मता याविषयावर तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन  तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन परिसरातील नागरिकांसाठी केले जाते,  परिसरातील बाळगोपाल, युवक, युवती, पुरुष, महिला या सर्वांचा समावेश प्रत्येक कार्यक्रमास असतो.

मंडळाचे हे एकविसावे वर्ष असून यावर्षी अयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्र यांच्यासह तेथील मंदिराची आरासाची गणेश मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. याश्वितेसाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उमाकांत जाधव उपाध्यक्ष हितेश पाटील, अजय खरात, सचिव सिद्धांत कदम असून यावर्षी गणेशोत्सव अध्यक्ष मंथन ईशी, सचिव प्रसन्न जाधव, गणेश कुमावत, हर्षल चौधरी, लोकेश बोरसे, चेतन हातकर, पंकज पाटील, भूषण माळी, हर्षल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, धिरज पाटील, धिरज महाजन, जयेश महाजन, निखिल पाटील, मोनु पाटील, पराग पाटील, केतन देवराज सुदर्शन ईशी, ओम ईशी, चेतन कोळी प्रतीक सोनवणे, आदित्य कुमावत, केतन पाटील, मोहित राणे, ओम सोनवणे, कृष्णा ईशी आदी कामकाज पाहत आहेत.

 

Exit mobile version