Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सांगलीत कोरोनाचे पाच रूग्ण ; राज्यातील रुग्णांची संख्या ११२ वर !

सांगली (वृत्तसंस्था) सांगलीत करोनाचे आणखी पाच रूग्ण सापडले आहे. एकाच कुटुंबातील पाच जण चार करोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्याने त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यांचे नमूने चाचणीसाठी पाठवल्यानंतर ते पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आता राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ११२ वर पोहोचली आहे.

 

राज्यातील कोरोनाग्रस्थांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज सांगलीतील इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्थांचा आकडा 112 वर पोहोचला आहे. तर देशातील कोरोनाग्रस्थांची संख्या 570 वर पोहोचली आहे. देशातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या विचारात घेतल्यास महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर आहे.

Exit mobile version