Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सह्याद्री प्रतिष्ठान भुसावळ शाखेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

चाळीसगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्रात ब्लॅड बॅकेतील साठा लाॅकडाऊनमुळे कमी झाल्यामुळे सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या गड-किल्ले संवर्धन करणाऱ्या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विवीध शाखाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. आज सह्याद्री प्रतिष्ठान भुसावळ तालुक्याच्या वतीन धन्वंतरी ब्लड बँक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सह्याद्री प्रतिष्ठानच्या भुसावळ तालुका शाखेतर्फे सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराला सह्याद्री प्रतिष्ठानचे भुसावळ तालुका अध्यक्ष कल्पेश भांरबे, कार्याध्यय कुंदन प्रकाश कोळी, खुशाल लक्ष्मन कोळी, रोशन सोनवणे, कैलश शर्मा, महेश शर्मा, रविंद्र परदेशी, हितेश राणे, रितीक भारंबे, रिक्षभ दाभाडे ,पंकज चौधरी यांनी नियोजन करून रक्तदान शिबीराचे आयोजन केले.

Exit mobile version