Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सहावीच्या विद्यार्थ्यांने टाकावू वस्तूंपासून बायोगॅस प्लांट तयार केले!

सावदा- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने कचऱ्याचा वाढता प्रमाण लक्षात घेऊन टाकावू वस्तूंपासून बायोगॅस प्लांट तयार केले आहे. यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

तालुक्यातील चिनावल येथील समर्थ फाउंडेशनच्या इयत्ता सहावीतील विद्यार्थी दिव्येश भूपेंद्र सरोदे यांनी टाकाऊ वस्तूपासून बायोगॅस प्लांट तयार केला आहे. जसे की,
जुन्या पाण्याची टाकीचा वापर करून त्यांनी हे बायोगॅस प्लांट तयार केला आहे. दरम्यान सदर प्रकल्पासाठी मला फक्त ५०० रू खर्च आले असून यासाठी प्रा. दिपकराज पाटिल, भूपेन सरोदे व डॉ. प्रशांत सरोदे यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे दिव्येश भूपेंद्र सरोदे यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

तत्पूर्वी बायोगॅस संयंत्रातील पदार्थ ऑक्सिजन विरहित माध्यमात कुजल्यानंतर तयार होणारा बायोगॅस एका आउटलेट मुळे व दुसऱ्या आउटलेटमुळे निर्माण होणाऱ्या स्लरी गॅसच्या दाबामुळे बाहेर पडते. दरम्यान या प्लांटमुळे स्वयंपाकासाठी व इतर घरगुती उपयोगासाठी बायोगॅस चा वापर करणे, ग्रामिण भागातील स्त्रीयांचे धुरापासून संरक्षण करणे व सरपणासाठी पडणाऱ्या कष्टापासून सुटका करणे,
सरपणासाठी आवश्यक असलेली लाकुडतोड थांबवुन वनांचे संरक्षण करणे, बायोगॅस प्रकल्पा पासुन निर्माण होणाऱ्या शेणखतांचा वापर शेतीसाठी करुन रासायनिक खतांचा वापर कमी करणे, शौचालयाची जोडणी बायोगॅस सयंत्रास करून गाव व परिसर स्वच्छ करणे, बायोगॅस चा वापर करून डिझेल व पेट्रोलचा वापर कमी करणे आदी उद्दिष्टे साध्य होऊ शकतात. स्लरी हे उच्च प्रतीचे सेंद्रिय खत आहे. बायोगॅस संयंत्रामध्ये कुजण्याची प्रक्रिया हवा विरहित होत असल्यामुळे बायोगॅसपासून मिळणारे खत हे द्रवरूप आणि घन रूपात (वाळवून) अशा दोन प्रकारे वापरता येते. सदरच्या खतामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत होते. स्लरीरूपात खत शेतात वापरल्यास खत शेतामध्ये मुरून पिकास उपयुक्त ठरते. कमीत कमी खर्चात प्रकल्प केल्याने समर्थ फाऊंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी कोल्हे, प्रा. दीपकराज पाटील, एकलव्य कोल्हे यांनी दिव्येश भूपेंद्र सरोदे याचे कौतुक केले आहे.

Exit mobile version