Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सलग 21 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय बाजारात आज (27 जून) सलग 21 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत आज पेट्रोल 25 पैसे आणि डिझेल 21 पैसे महागले आहे.

 

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील 21 दिवसांपैकी बरेच दिवस क्रूड ऑईलचे दर सामान्यच राहिले आहेत. पण भारतीय बाजारात याचे दर सतत वाढत आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोल 80.38 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 80.40 रुपयांवर पोहोचले आहे. मागील तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये डिझेलचा दर पेट्रोलपेक्षा जास्त आहे. मागील 21 दिवसात डिझेल 11 रुपये आणि पेट्रोल 9.12 रुपयांनी महागले आहे. दरम्यान, सध्या कच्च्या तेलाची किंमत 40 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास आहे. पण पेट्रोल-डिझेलच्या किमतीत त्या हिशेबाने कमी झालेल्या नाहीत.

Exit mobile version