Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सलग सातव्या दिवशी नव्या बाधितांचा आकडा दोन लाखांच्या आत

 

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात आज सलग सातव्या दिवशी नव्याने बाधित आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या आत आहे. आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

 

देशात गेल्या २४ तासात एक लाख ३४ हजार १५४ नव्या बाधितांची नोंद झाली तर दोन लाख ११ हजार ४९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १७ लाख १३ हजार ४१३ वर पोहोचली आहे.बरे झालेल्या रुग्णांचा आकडा आता दोन कोटी ६३ लाख ९० हजार ५८४ झाला आहे.

 

देशात काल दिवसभरात कोरोनामुळे २ हजार ८८७ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातल्या मृतांचा एकूण आकडा आता तीन लाख ३७ हजार ९८९ वर पोहोचला आहे.  देशातला मृत्यूदर सध्या १.१९ टक्के इतका आहे.

 

देशातल्या लस घेतलेल्या नागरिकांची संख्या आता २२ कोटी १० लाख ४३ हजार ६९३ वर पोहोचली आहे. काल दिवसभरात देशातल्या एकूण २४ लाख २६ हजार २६५ नागरिकांनी लस घेतली. २१ लाख ९० हजार ९४१ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचा आकडा दोन लाख ३५ हजार ३२४ इतका आहे.

 

Exit mobile version