Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सर्वांना हा माणूस हवा असे वाटणे हेच या बहुआयामी नेतृत्वाचे यश- एकनाथराव खडसे (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । राजकीय पक्षांचे विचार वेगळे असू शकतात मात्र , सर्वांना हा माणूस हवा असे वाटणे हेच या बहुआयामी नेतृत्वाचे यश आहे असे प्रशंसोद्गार आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात काढले.

यावेळी एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की , सर्वच क्षेत्रांमध्ये यापुढेही त्यांच्या मार्गदर्शनाची गरज सर्वांनाच राहणार आहे ते राजकारणात असले तरी चौफेर अभ्यास आणि स्वारस्य हे त्यांच्या नेतृत्वाचे खरे रहस्य म्हणता येईल सामाजिक जाणिवांचा प्रगल्भ चिन्तन असणारा हा नेता कला आणि साहित्यातही तितकाच रमतो त्यामुळे ते आता ८० वर्षांचे झाले असले तरी कोणत्याही क्षेत्रातील प्रत्येकाला वाटते हा माणूस आपल्यसाठी असावा . बॉम्ब स्फोट मालिका झाल्यावर मुंबई हादरली , स्तब्ध झाली, मुकी झाली; प्रत्येकाच्या मनात भय आणि शंका होत्या . मात्र नंतरच्या आठवडाभरात मुंबई सावरली टी शरद पवारांमुळंच. त्या काळातील परिस्थिती सुरळीत काण्याची ताकद त्यांनी दाखवली आपत्ती व्यवस्थापन कसे असते हे सांगणारा आणि ते करणारा त्यांच्यासारखा दुसरा कुणी माणूस नाही . किल्लारीच्या भूकंपात हजारो माणसं गेलीत , हजारो निर्वासित झाली त्यावेळी याच माणसाने समाजातला माणूस उभा केला जिद्दीने त्याला प्रोत्साहन दिले . त्यातूनच पुढे गुजरातेतील भूकंपाच्या आपत्तींत अटलजींनी शरद पवारांची जाण आणि आठवण ठेवली आणि तेथील आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी दिली वर्षानुवर्षे काम करताना सार्या समाजातून हा नेता जोडून राहणारा आहे ही ख्याती त्यांना आहे , असेही ते म्हणाले .

 

 

 

Exit mobile version