Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सर्वधर्मीय साधुसंताना कोरोना लसीसाठी ओळखपत्राची सक्ती नको

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  सर्वधर्मीय साधुसंत आणि जैन मुनींचे लसीकरण करण्यासाठी पालिकेने धोरण तयार करावे, अशी मागणी भाजपने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.

 

कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करताना पॅन कार्ड अथवा आधारकार्ड पुरावा म्हणून ग्राह््य धरला जातो. मात्र, साधु हे सर्वत्र फिरत असतात व त्यांचा कायमचा पत्ता नसतो. त्यामुळे त्यांच्याकडे आधारकार्ड नसते. त्यामुळे त्यांना ओळखपत्राशिवाय लस देण्यासाठी धोरण तयार करावे, अशी मागणी भाजपने केली आहे.

 

गुजरातने यावर तोडगा काढत नोंदणीकृत धर्मादाय संस्था, मंदिर तसेच वयाबाबत डॉक्टरने दिलेले प्रमाणपत्र ग्राह््य मानून लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. त्याच आधारावर मुंबईतही अशा प्रकारे लसीकरण करण्यात यावे. त्यासाठी एक धोरण आखावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे केली होती. अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी ही मागणी मान्य केल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे.

Exit mobile version