Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सर्प जनजागृतीने वन्यजीव सप्ताहाचा समारोप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । 1 ते 7 ऑक्टोबर हा सप्ताह वन्यजीव सप्ताह म्हणून भारत भरात साजरा करण्यात येतो, यासाठी वनविभाग, सामाजिक संस्था, आणि वन्यजीव प्रेमी विविध प्रकारचे जनजागृती कार्यक्रम राबवित असतात. वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे गेल्या 15 वर्षापासून हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या वर्षी जळगांव नासिक आणि नंदुरबार या जिल्ह्यात संस्थेतर्फे 7 दिवस विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.

यात शालेय विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला तिन्ही जिल्ह्यातील सुमारे लाख लोकांपर्यंत पोहोचून संस्थेच्या 300 कार्यकर्त्यांनी विविध माध्यमातून जनजागृती केली या साठी वनविभागाचे मार्गदर्शन लाभले. जळगांव शहरातील विविध शाळांमध्ये वृक्ष आणि सर्पजनजागृती करून सप्ताहाची सांगता करण्यात आली.

आज रोजी वन्यजीव सप्ताह समारोप निमित्ताने सरस्वती माध्यमिक विद्यालय ,बाल निकेतन माध्यमिक विद्यालय ,तथा बहिणाबाई माध्यमिक विद्यालय येथे सर्प जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. वन्यजीव संरक्षण संस्था व आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्या माध्यमातून शून्य सर्पदंश व सर्प जनजागृती अभियान राबविले. वन्यजीव सप्ताह काळात शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक यांनी सापांची माहिती दिली जगदीश बैरागी यांनी सापांविषयीचे विज्ञान व योगेश गालफाडे यांनी साप आपल्या परिसरात यायला नको याकरता घ्यावयाची काळजी तसेच राजेश सोनवणे, कृष्णा दुर्गे यांनी साप चावल्यानंतर करावयाचा प्राथमिक उपचार याचे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच वन्यजीव सप्ताह मध्ये विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष प्राणी पक्षी फुलपाखरे, कीटक, वनस्पती यांचे संवर्धन झाले पाहिजे याकरिता विद्यार्थ्यांना माहिती दिली. नासिक जिल्ह्यात मानव बिबट सहजीवन जनजागृती रॅली, अरण्यवाचन, पक्षीनिरीक्षण, चित्रकला स्पर्धा अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यात सर्प मानव आणि पर्यावरण या विषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठी माहिती कार्यशाळा घेण्यात आल्या.

कार्यक्रमांच्या यशस्वीते साठी मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो चे स्वयंसेवक बाळकृष्ण देवरे, सचिव योगेश गालफाडे, संस्थापक रवींद्र सोनवणे, पक्षी अभ्यासक राहुल सोनवणे, निलेश ढाके, प्रसाद सोनवणे, राजेश सोनवणे, जगदीश बैरागी, कृष्णा दुर्गे, प्रभाकर निकुंभ, सुशांत रणशूर, जयेश पाटील, अमोल सोनवणे, मुकेश सोनार, हेमराज सपकाळे, सागर निकुंभे , मनोज चौव्हाण , अक्षय नाईक, यांनी परिश्रम घेतले

Exit mobile version