Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सर्पदंश झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू; नशिराबाद पोलीसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ येथील तरूणाला सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अधिक माहिती अशी की, भारत दिलीप बाविस्कर (वय-२२, रा. समता नगर भुसावळ) हा डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे. १४ नाव्हेंबर दिपावलीच्या दिवशी रात्री १० वाजेच्या सुमारास घरी दोन मुलींसोबत असलेला असता असतांना अचानक घराच्या ओट्यावर साप आल्याचे पाहून दोन्ही मुलांच्या वाचविण्याच्या नादात त्याला सर्पदंश झाला. त्याला तातडीने गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version