Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सरीवरंबा मिश्रपिक पद्धीतीने पिकांची लागवड केल्यास जमीनी सुपीक बनते : तालुका कृषी अधिकारी जाधव

यावल प्रतिनिधी । शेतकऱ्यांनी सरी-वरंबा पद्धतीने मिश्र पिकपेरणीच्या पद्धतीचा अवंलब केल्यास लागवड व तिचे फायदा मिळण्याबाबत यावल तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी मार्गदर्शनपर दिलेल्या आपल्या मुलाखतीत दिली आहे.

यावल तालुक्यातील शेतकरी बांधव हे मुळ पारंपारीक पद्धतीने केळी पिकविण्याकडे कल असतो, यात शेतकऱ्यांनी जर पिकपेरणी करण्यासाठी सरी वरबां पद्धतीने मिश्रपिक पद्धीने लागवड केल्यास भविष्यात मुलस्थानी मृद व जलसंधारण बरोबरच कृषी निविष्ठांची बचत त्याचबरोबर पाण्याची बचत प्रतिकुल परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या एकादे पिकाचे नुकसान झाल्यास दुसऱ्या पिकांत भरपाई निघुन उत्पादनाची हमी राहते, मिश्रपिक पद्धतीने शेती पिके उत्पादीत केल्यास जमिनीचा पोत सुधारतो व जमीन सुपिक बनते त्यामुळे आपोआपच नैसर्गिक शेती पद्धतीला प्रोत्साहन मिळते असे यावल तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी शेती व मिश्र पिक पद्धतीच्या संदर्भात दिलेल्या आपल्या मुलाखातीत म्हटले आहे .

Exit mobile version