सराफा व्यावसायिकाला लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील नरवेल रोडवर सराफा व्यवसायिकाला दरोडेखोरांनी रस्ता अडवून त्यांच्या जवळील सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण १० लाख ६० हजार रुपये किमतीचा ममुद्देमाल चोरून नेणाऱ्या ५ संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक एस. राजकुमार यांनी रविवार ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील नरवेल रोडवर एका सराफा व्यावसायिकाचा दरोडेखोरांनी सोन्याचे चांदीचे दागिने हिसकावून सुमारे १० लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी हे जळगाव शहरातील असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील यांना मिळाली. तसेच हे गुन्हेगार अटल गुन्हेगार असून त्यांच्यावर वेगवेगळे चोरीचे चार गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संशयित आरोपींना अटक करण्यात आली पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिला. यात पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमूल देवढे, पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, अनिल जाधव, युनूस शेख यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी यांनी अथक परिश्रम करून संशयित आरोपी सुनील मिस्त्रीलाल जाधव (वय-२३) रा. अंजाळे ता. धुळे ह.मु. मच्छी बाजार सुप्रीम कॉलनी, प्रकाश वसंत चव्हाण (वय-३०) रा. भिकनगाव मध्यप्रदेश ह.मु. सुप्रीम कॉलनी, आकाश दिलीप पवार (वय-२४) रा. लोणवाडी ता.जळगाव हल्ली मुक्काम भवानी चौक सुप्रीम कॉलनी, विशाल देविदास मराठे (वय-२३) रा. रायपूर कंडारी आणि विनोद विश्वनाथ इंगळे (वय-३४) रा. उचंदा ता. मुक्ताईनगर अशा पाच संशयित आरोपींना जळगावच्या टीमने अटक केली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत केलेली १२ लाख ८० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये चोरी गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकींचा समावेश आहे. या पाचही संशयित आरोपींना पुढील कारवाईसाठी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content