Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सम्मेदशिखरजीला पर्यटनस्थळ बनवू नये – जैन समाजाची मागणी

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | झारखंड येथील राज्य सरकारने सम्मेदशिखरजी स्थळाला पर्यटन स्थळ घोषित केल्याने तेथील पावित्र्यता राहणार नाही. यासाठी पर्यटन स्थळ करू नये, अशा मागणीचे निवेदन अमळनेर शहरासह तालुक्यातील सकल जैन समाजाने आज ता.21 रोजी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना दिले आहे.

झारखंड येथील जैन समाजाचे तीर्थ स्थळ येथील राज्य सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याने तेथील तीर्थ स्थळाचे पावित्र्य जोपासले जाणार नाही. सध्यस्थीतीत पर्यटन स्थळी येणारे पर्यटक त्या स्थळी मांसाहार, दारू आदी धूम्रपान करतील त्यामुळे तेथील पावित्र्यता टिकणार नाही यासाठी येथील पर्यटन स्थळ न होता ते तीर्थस्थळ राहू द्यावे याच बरोबर भारतातील सर्व जैन तीर्थस्थळाला सुरक्षाकवच प्रधान करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांना पाठवण्यात आले असून आज बहुसंख्य जैन समाज बांधव यांनी शांततेत रॅली काढीत तहसील कार्यलयात निवेदन दिले.

Exit mobile version