Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

समलिंगी संबंधाला विरोध करणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून !

लखनौ (वृत्तसंस्था) आपल्या भाडेकरुच्या पत्नीशी समलिंगी संबंध ठेवता यावेत, यासाठी घरमालकीणीने स्वत:च्या नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये उघडकीस आली आहे.

 

अलिगढमधील कुंवरनगर भागात राहणाऱ्या भूरीसिंग गोस्वामी यांचा मृतदेह होळीच्या रात्री एका नाल्यात सापडला होता. मृतदेहाचे हात-पाय दोरीने बांधलेले होते. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता, त्याचा गळा दाबून खून झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, दुसर्‍या दिवशी मयत भूरीसिंग यांने आपल्या भावाची पत्नी रुबी, त्यांचा भाडेकरु हरिओम डब्बू आणि त्याची पत्नी रजनी यांच्यावर हत्येचा आरोप केला. कारण भूरीसिंगची पत्नी रुबीचे भाडेकरु रजनीशी समलैंगिक संबंध होते. भूरीसिंग यांना या संबंधांविषयी समजताच त्यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे रुबी आणि रजनी यांनी आपल्या भावाचा खून केल्याचे म्हटले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपी महिलांना अटक केली आहे.

Exit mobile version