Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

समरसता ध्वजारोहणाप्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराजांचा सन्मान

फैजपूर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनिधी |  शहरालगत असलेल्या निष्कलंक धाम वढोदा येथे समरसता महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समरसता ध्वजारोहणाप्रसंगी  फैजपूर शहरातील विविध सामाजिक व जाती धर्मातील प्रतिनिधींनी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराजांचा सन्मान केला.

 

 

देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक निवास करीत आहे. या सर्व जाती बांधवांना एकत्र करण्याचे व समाजात बंधुभाव निर्माण करण्याचे कार्य संत महात्मे अविरत करीत आलेले आहे. अलीकडच्या काळात हेच कार्य अधिक प्रभावी व्हावे तसेच सर्व धर्माचे अनुयायी भेदाभेद सोडून एकाच व्यासपीठावर यावे या प्रमुख उद्देशाने महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराजांनी फैजपूर शहरालगत असलेल्या निष्कलंक धाम वढोदा येथे समरसता  महाकुंभाचे आयोजन केले आहे. या महाकुंभात सुमारे ४५० संत महात्मे व संपूर्ण देशभरातून भाविक भक्तगण येणार आहेत. या महाकुंभाची तयारी गुरुवारी धर्मध्वजाची विधिवत स्थापना करून करण्यात आली. या धर्म ध्वजाची  पूजा व स्थापना करताना सर्व जाती धर्माचे प्रतिनिधी करण्यात आले होते. या ठिकाणी सर्व जाती धर्मातील ४०  प्रतिनिधी स्वरूपात मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते धर्म ध्वजाची पूजा करून खऱ्या अर्थाने समरसता निर्माण करण्याचा पाया या कुंभात रचण्यात आला आहे. यामुळे जिल्हाभरातील विविध सर्व समाज बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून या भव्य दिव्य महाकुंभाच्या आयोजनाबद्दल उपस्थित समाज बांधवांतर्फे प्रतिनिधी म्हणून मसाकाचे संचालक नरेंद्र नारखेडे यांच्या हस्ते महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांचा  गौरव करण्यात आला.

यावेळी विजयकुमार परदेशी, सुधीरसिंह राजपूत सर, किशोरशेठ गुजराथी, वसंतशेठ कुंभार, सुनील जैन टेलर, माजी नगरसेवक राकेश जैन, संकेश तांबट, पंकज मोरे, प्रणव माहुरकर, युगंधर पवार, गणेश गुरव, कुंदन जयकर, कल्पेश खत्री, दीपक बारी, सुनील कोष्टी, नंदू जोशी, केदार बैरागी, जितु भावसार, संतोष तांबट, नंदकिशोर अग्रवाल, डायाभाई पटेल, बंटी आंबेकर, हरिभाई भरवाड आदी समाज बांधव उपस्थित होते.

 

Exit mobile version