Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

समता नगर येथील रहिवाशी आक्रमक झाल्याने कारवाई स्थगित (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | समता नगर येथील अतिक्रमित घरे पाडण्यासाठी मनपा पथक आले असता रहिवाश्यांनी पर्यायी जागा न दिल्यास जेसीबीसमोर झोपून कार्यवाही करू देणार नाही असा पवित्रा घेतला होता. गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून या ठिकाणी नागरिक राहत आहे घरपट्टी पाणीपट्टी भरत असतांना ही कार्यवाही का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 

संभाजीनगर ते कोल्हे हिल्सदरम्यान रस्त्याचे काम केले जाणार आहे. यादरम्यान ज्या घरांचे बांधकाम आहे ती पाडली जाणार आहेत. कारवाईसाठी जेसीबीसह कर्मचारी अधिकाऱ्यांचा ताफा गुरुवारी समतानगरात दाखल झाला. मात्र रहिवाशांनी कारवाईला तीव्र विरोध केला. अधिकाऱ्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले तसेच मार्किंग केल्यानुसार संबंधित घरांच्या कागदपत्रांचीही तपासणी केली. नागरिकांनी विरोध केल्याने कारवाई न करताच महापालिकेचे कर्मचारी अधिकारी परतले. यावेळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपायुक्त श्याम गोसावी यांनी रस्त्याच्या कामादरम्यान जे अतिक्रमित घरे अाहेत त्यांच्या कागदपत्रांची पाहणी केली. त्याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना दिली जाणार आहे. अतिक्रमित घरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या पर्यायी व्यवस्थेबाबतही वरिष्ठस्तरावर निर्णय होईल. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. तर आरपीआय महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून या ठिकाणी नागरिक राहत आहे. त्यांच्या अडचणी समजून घेऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. पर्यायी व्यवस्था झाल्यावरच घरांचे अतिक्रमण पाडण्यात यावे अन्यथा जेसीबीसमोर झोपु कारवाई करु देणार नाही.

भाग १

भाग २

भाग ३

भाग ४

Exit mobile version