Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

समता नगर परिसरातील झोपड्या व पक्की घरे काढू नये – वंचित बहुजन आघाडीची मागणी (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मौजे-मेहरूण  शिवारातील समता नगर परिसरातील ५३ झोपड्या व ७ पक्के घराचे अतिक्रमण काढण्यात येऊ नये अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली.

 

महापालिकेच्या अतिक्रमण विभाग यांच्याकडून तोंडी माहिती अधिकार मिळालेल्या माहितीनुसार दि. १०/०८/२०२१ रोजी रविंद्र एस.चौधरी मौजे-मेहरूण शिवारातील डी.पी. रोड समतानगर येथील अतिक्रमण हटवणे बद्दलचे अर्ज महापौरांना देण्यात आलेले आहे. रवींद्र चौधरी यांनी अतिक्रमण काढतांना लागणाऱ्या पोलीस बंदोबस्तचा खर्च स्वतः करणार असल्याचे महापालिकेला पत्राद्वारे कळविले आहे. रविंद्र एस.चौधरी यांनी महापालिकेस दोन अर्ज दिलेले आहेत व दोघ अर्जात फक्त त्यांचे नाव व सामाजिक कार्यकर्ता तसेच.मोबाईल नंबर दिलेला आहे. याचा अर्थ असा होतो की, ते समतानगर किंवा त्यापुढील भागातील रहिवासी नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. समतानगर परिसरातील प्रस्तावित डी.पी.रोडवर घरे बांधुन रहात असलेले नागरीक हे मागासवर्गीय व गरीब आहेत. ५३+७ घरांमध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील अनु.जाती/जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात रहात आहे व त्यांनी वेळोवेळी महापालिकेचे विविध कर सुद्धा भरत आहे. सदरचा प्रस्ताविक डिपी रोड वरील अतिक्रमण हटवून नागरीकांसाठी रस्त मोकळा करणेबाबत आजपावेतो तेथील किंवा त्यापुढील कॉलनी, वस्त्यातील रहिवासी यांनी महापालिकेत आज पावेतो अर्ज केलेला नाही. परंतु रविंद्र एस.चौधरी हे समतानगर परिसराच्या पुढील भागात किंवा परिसरात राहत नसतांना त्यांनी जाणीव पुर्वक तेथील मागासवर्गीय अनु.जाती/जमातीचे नागरीक मोठ्या प्रमाणात राहत असल्याने त्यांनी जातीवादी दृष्टीकोन ठेवून त्यांना बेघर करून उपासमारी करण्याचे काम रविंद्र एस.चौधरी हे करीत असुन त्यांचेवर अनु.जाती/जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा ८ दिवसाच्या आत दाखल करण्यात यावा अन्यथा . समतानगर परिसरातील मागासवर्गीय व गरीब बांधवाच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन युवा आघाडी जळगाव जिल्ह्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी उपजिल्हाध्यक्ष ललित घोगले, प्रमोद इंगळे, जिल्हा महासचिव यशराज पाटील, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, .राहुल सुरवाडे आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version