Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

समता नगरातील प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समता नगरातील ५८ वर्षीय प्रौढ व्यक्तीने घरातील बाथरूममध्ये दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवाजी रामकृष्ण निकम (वय-५८) रा. समता नगर, जळगाव असे मृत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

 

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजी निकम हे शहरातील समता नगरात पत्नी व मुलासह वास्तव्याला होते. सेंट्रींगचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गुरूवार १५ जून रोजी पत्नी ज्योती निकम ह्या कामावर निघून गेल्या. दुपारी शिवाजी निकम हे मुलगा राजेंद्र सोबत घरी होते. दुपारी मुलगा हा घराबाहेर बसलेला असतांना शिवाजी निकम यांनी राहत्या घरातील बाथरूममध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पत्नी ज्योती ह्या कामावरून घरी आल्या. त्यावेळी पतीने गळफास घेतल्याने पाहताच त्यांनी आक्रोश केला होता. शेजारी राहणाऱ्या तरूणांनी मृतदेह खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला व अजिज शहा करीत आहे.

Exit mobile version