Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

समतानगरात अवैध देशी दारू विक्रेत्यावर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । रामानंद नगर पोलीस हद्दीतील समता नगरात अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. मात्र या कारवाईत दारूविक्रेता फरात झाला असून २० लिटर देशी दारू पोलीसांनी हस्तगत केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रविंद्र भिमराव साळुंखे रा. समता नगर हा ९ मार्च रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास रामानंद नगर हद्दीतील समता नगर परीसरात अवैधरित्या देशी दारू विक्री करत असल्याची माहिती रामानंद नगर पोलीसांना मिळाल्यानंतर सहाय्यक फौजदार गोपाल चौधरी, नापोकॉ रविंद्र पाटील, उमेश साळुंखे यांनी कारवाई करत छापा घातला असता संशयित आरोपी रविंद्र साळुंखे हा गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असतांना दिसून आला. पोलीस येत असल्याचा संशय आल्याने रविंद्र गावठी हातभट्टीची दारूची कॅन जागीच सोडून पसार झाला होता. रामानंद नगर पोलीसात एक हजार रूपयांची गावठी देशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version