Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सदाबहार गीते सादर करत “गीतगंगा २०२१’ ने विद्यार्थी मंत्रमुग्ध                   ‘

जळगाव, प्रतिनिधी | खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे स्वरदा संगीत विभाग आयोजित गीतगंगा २०२१ कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सदाबहार गीते सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.

 

नको चंद्र तारे,एक अजनबी हसीना से,दिल है छोटासा ,रुपेरी वाळूत,अधीर मन,चंदन झाली रात,मेरे रश्के कमर,चोगडा तारा,चुरालीया है तुमने अश्या एकापेक्षा एक सदाबहार गीते सदर करून  ११ वी १२ वी च्या  विद्यार्थी विद्यार्थ्यानिनी महाविद्यालय सुरु झाल्यानंतर पहिल्या सुमधुर कार्यक्रमात सगळ्यांना ठेका घ्यायला भाग पडले. कित्येक दिवसानंतर विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात भाग घेऊन कोविड काळातील कटू आठवणीना दूर सारत सहभाग घेतला. शर्वाणी भालेराव, रसिका ठेपे, समय चौधरी, भूमिका सोमाणी, रिया सुरणा, भूमिका सुर्वे, अमय दानी ,अनुजा मंजुळ, साहिल सूर्यवंशी, मोहिनी पवार, नमिता पाटील, अनुराग ,वैभव सोनवणे यांनी गीते सादर केली. या कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयातील ११ वी १२ वी चे विद्यार्थी सहभागी होते. यात विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी गीते सादर करून सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे नियोजन संगीत विभाग प्रमुख प्रा.कपिल शिंगाणे  आणि प्रा.देवेंद्र गुरव यांनी केले.यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य करूणा सपकाळे, प्रा. उमेश पाटील ,प्रा. प्रसाद देसाई,प्रा. स्वाती बऱ्हाटे, एस.ओ.उभाळे उपस्थित होते.यावेळी विद्यार्थी ,शिक्षक उपस्थित होते.

Exit mobile version