Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सत्य येत नाही तोवर मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्‍नच नाही ! – शरद पवार

 

मुंबई प्रतिनिधी । सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांना अनेक कंगोरे असून याची पोलीस तपासणी होऊन सत्य बाहेर येणे गरजेचे आहे. आणि जोवर सत्य बाहेर येत नाही तोवर मुंडे यांना राजीनामा घेण्याचा प्रश्‍नच येत नसल्याचे प्रतिपादन आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपारी प्रसारमाध्यमांशी बोलतांना धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. ते म्हणाले की, काल मी या प्रकरणावर बोललो तेव्हा संपूर्ण चित्रं माझ्यासमोर नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार केल्यावर तिची दखल घेतली. त्यामुळे गंभीर हा शब्द वापरला. आता सर्व चौकशी करावी आणि कुणावरही अन्याय होऊ नये असं वाटतं.

काल रात्रीच राष्ट्रवादीची बैठक झाली आहे. या पार्श्‍वभूमिवर, मुंडे यांच्या कारवाईबाबत शरद पवार म्हणाले की, मुंडे यांचा राजीनामाचा घ्यावा किंवा नाही. यावर मतभिन्नता असू शकते. आरोप करणार्‍या महिलेच्या बाबतीत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समो आली पाहिजे. नाही तर कुणावरही आरोप करायचे आणि त्या व्यक्तीला सत्तेपासून दूर करायचं अशी प्रथा पडू शकते. गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांचं आहे. पोलिसांनी या प्रकरणात खोलात जाऊन तपास करावा. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्‍नच येत नाही असे शरद पवार म्हणाले.

Exit mobile version