Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

 

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माळी समाज व पाटील समाज मढी लहान माळीवाडा येथे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले. सत्यशोधक विचार मंच व सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम जगद्गुरु तुकोबाराय, संत शिरोमणी सावता माळी, कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहूजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

यांनी केले रक्तदान

रक्तदान शिबीरात आबासाहेब राजेंद्र वाघ, हेमंत माळी, लक्ष्मणराव पाटील, गोरख देशमुख, आनंद पाटील, धनपा गटनेते विनय भावे, तेली समाजाध्यक्ष सुनिल चौधरी, पत्रकार कमलाकर पाटील, दिनेश भदाणे, प्रफुल्ल पवार, परशुराम पाटील, दिपक मराठे, रोहीत इंगळे, महेश्वर पाटील, मनिष चौधरी, लोकेश जाला, मनोज महाजन, अविनाश महाजन, विश्वास भाटीया, रामनाथ माळी, धीरज चौधरी, पी.डी.पाटील या सत्यशोधक मावळ्यांनी रक्तदान दिले.

यांनी घेतले परिश्रम

जळगाव येथील जीवन ज्योती ब्लड सेंटरचे प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर पाटील, शुभम गवळी, जगदीश सोनार, वृषल पाटील, गणेश गव्हाणे यांसह आदींनी काम पाहिले. तद्नंतर उपस्थित सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. आजच्या दिनाचे औचित्य साधून रक्तदान, महापुरुषांचे ग्रंथ भेट, वृक्षारोपण करण्यात आले. त्याच प्रमाणे शहरातील विविध शाळेत शैक्षणीक कार्यक्रम, विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

कार्यक्रमास यांची उपस्थिती

याप्रसंगी पाटील समाजाचे अध्यक्ष भीमराज पाटील, माळी समाज अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, सल्लागार तथा, जेष्ठ पत्रकार कडू महाजन, तेली समाजाध्यक्ष सुनील चौधरी, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, गटनेते विनय भावे, माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन अँड.वसंतराव भोलाणे, रवींद्र पाटील, दिलीप धनगर, संभाजी कंखरे, धनराज माळी सर, माधवराव पाटील, दगा मराठे , राजेंद्र पाटील, सोमा साळी, दिलीप मांगो महाजन, दिपक माळी, किशोर पाटील, महेश पाटील, किशोर पवार, प्रेस रिपोर्टर जितेंद्र महाजन, रामनाथ माळी, सुधाकर महाजन, धीरेंद्र पुरभे, नगराज पाटील, कमलेश बोरसे, राहुल रोकडे, कैलास पवार, सुधाकर मोरे, विक्रम पाटील, जितेंद्र पाटील, पत्रकार निलेश पवार, अविनाश बाविस्कर तसेच सत्यशोधक विचार मंच, सत्यशोधक शतकोत्तर महोत्सव समिती धरणगाव व शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर विचारांचे पाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सत्यशोधक विचार मंच हे धरणगाव व परिसरात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते. तसेच या सामाजिक मंडळाच्या वतीने महापुरुषांचे अनमोल ग्रंथ, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, व्याख्यान शिबीरे, गुरुजनांचे सन्मान असे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे संत – महापुरूषांचे खऱ्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याचे काम सत्यशोधक विचार मंच च्या वतीने होत असते.

Exit mobile version