Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सत्तापिपासू भाजप आता रक्तपिपासू झालाय- थोरात

Balasaheb thorat news

मुंबई प्रतिनिधी । जेएनयू प्रकरणी जोरदार टीकास्त्र सोडतांना सत्तापिपासू भाजप आता रक्तपिपासू झाल्याचा आरोप महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

जेएनयूमधील मारहाणीचे मोठ्या प्रमाणात पडसाद उमटत आहेत. महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसून विद्यार्थी तसेच शिक्षकांवर प्राणघातक हल्ला करणार्‍यांच्या पाठिमागे कोणाचे हात आहेत? हे स्पष्ट दिसत असून सत्तापिपासू भाजपा आता रक्तपिपासू झाला आहे. हा लोकशाही व संविधानावर करण्यात आलेला हल्ला असून ही बाब गंभीर तसेच चिंताजनक आहे. रात्रीच्या अंधारात हल्ला करून भाजपा विद्यार्थ्यांचाही आवाज दाबण्याचा तसेच त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे पण काँग्रेस पक्ष या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभा आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version