Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीला ५१ हजारांची देणगी

 

फैजपूर, प्रतिनिधी । येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट या धार्मिक व सेवाभावी संस्थेने ५१ हजार रुपयांची देणगी कोरोनाग्रस्तांसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीला दिली आहे. आज सकाळी प्रांत डॉ. अजित थोरबोले यांना ५१ हजार रुपयांचा चेक सुपूर्द करण्यात आला.

महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी देशाप्रती प्रेम, आपुलकी, बंधुभावभाव असून कोरोना या संकटावर मात करण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेतर्फे ५१ हजार रुपये देणगी देण्यात आली. समाजातील सेवाभावी नागरिकांनी सढळ हाताने पंतप्रधान सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीला दान देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी पत्रकार प्रा. उमाकांत पाटील व पत्रकार निलेश पाटील उपस्थित होते. प्रांत डॉ. अजित थोरबोले यांनी शासन करीत असलेल्या उपाययोजना, यात नागरिकांचा सहभाग व आपल्यासारखे संतमहंत यांनी पुढाकार घेऊन कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी सविस्तर चर्चा केली. त्यासाठी सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागणार आहे. आपण यात नक्कीच यशस्वी होऊ. मात्र नागरिकांनी संयम ठेवून आपल्यासह मुलाबाळांची काळजी घ्यावी व घाबरून न जाता आलेल्या संकटाला तोंड देणे महत्त्वाचे ठरेल असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version