Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘कोरोना वीर २०२०’ पुरस्काराने योद्ध्यांचा सन्मान

फैजपूर प्रतिनिधी । गेल्या तीन महिन्यापासून आपलं कुटुंब, संसार सोडून स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना, नागरिकांसाठी प्रबोधन, बाधितांना वेळेवर अचूक योग्य उपचार यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करून रात्रंदिवस झटणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार फैजपूर येथील सतपंथ चॅरिटेबलट्रस्टच्या वतीने केला असता.

कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज होते. या कार्यक्रमात ‘मानवसेवा परमो धर्मः’ ही हाजी शब्बीर हुसेन हाजी अखतर हुसेन उर्फ बाबू शेठ यांच्या कार्यावर आधारित चित्रफितीचे उद्घाटन करण्यात आले. भुसावळ येथील प्रसिद्ध आर्किटेक्चर भावेशभाई टाक यांनी हिंदुस्तान पेट्रोलियम पंपचे संचालक तथा समाज प्रेमी, समाज सेवक बाबुशेठ यांनी कोरोना विषाणूच्या कार्यकाळात गेल्या तीन महिन्यापासून परप्रांतीयांसाठी तथा स्थानिक रहिवाशांसाठी केलेली सेवा चित्रफितीत दाखविली आहे. बाबू शेठ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात बाबुशेठ, यावल रावेर विभागाचे प्रांत डॉ.अजित थोरबोले, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी, फैजपूरचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, एपीआय राहुल वाघ, एपीआय प्रकाश वानखडे, डॉ. श्याम बारेला, महावितरणचे अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांचा ‘कोरना वीर २०२०’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी प्रत्येकाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सुरेश शास्त्री मानेकर बाबा, नगराध्यक्ष अनिताताई येवले, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, राजू चौधरी यांच्यासह चाळीस-पंचेचाळीस मान्यवरांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सचे पालन करून हा कार्यक्रम मोठ्या थाटात घेण्यात आला. परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी यावेळी बाबुशेठ समाजासाठी जातीपातीच्या पलीकडे करीत असलेल्या निस्पृह कार्याचा त्यांनी गौरव केला. तसेच ‘मानवसेवा परमो धर्मः’ या लघुपटातून समाजात माणसाने कोणते कार्य करावे याचे प्रबोधन होईल. सर्व समानार्थी ते करीत असलेले कार्य महत्वपूर्ण असल्याने त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे अध्यक्षीय मनोगतात सांगितले. यावेळी प्रांत डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर पाटील सर तसेच उपस्थितांचे आभार ट्रस्टचे संचालक संजीव महाजन यांनी केले.

Exit mobile version