Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी !

जयपूर (वृत्तसंस्था) काँग्रेसने मोठे पाऊल उचलत सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. पायलट यांच्यासोबतच त्यांचे समर्थक विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांना देखील मंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे.

 

जयपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. आता गोविंद सिंह हे राजस्थान काँग्रेसचे नवे अध्यक्ष असतील. आज जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची दुसरी बैठक झाली. या बैठकीला सचिन पायलट अनुपस्थित होते. त्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले होते. तरीही ते अनुपस्थित राहिले. त्यानंतर आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर रणदीप सूरजेवाला यांनी पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याचा निर्णय जाहीर केला. रणदीप सुरजेवाला म्हणाले की, सचिन पायलट आणि त्यांची साथीदार भाजपच्या षडयंत्रामध्ये अडकले. मला अतिशय खेद वाटतोय की, आठ कोटी राजस्थानी जनतेने निवडून दिलेल्या काँग्रेस पक्षाचे सरकार पाडण्याचा कट हे लोक रचत आहेत. हे स्वीकारण्यासारखे नाही. त्यामुळे काँग्रेसने दु:खी मनाने सचिन पायलट यांना पदातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version