Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संसद भवनात अमळनेरचा आवाज

अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । भारत सरकारच्या युवा मंत्रालय व लोकसभा सचिवालय आयोजित माजी  पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात अमळनेरचे ॲड. सारांश सोनार यांनी राजभवनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

 

भारत सरकारच्या युवा मंत्रालय व लोकसभा सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथील संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित अभिवादन कार्यक्रमाला महाराष्ट्रातून एकमेव अमळनेर येथील युवा वक्ते ॲड. सारांश सोनार हे निमंत्रित होते. त्यांनी माजी  पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे बद्दल  त्यांनी विचार मांडत, मनोगत व्यक्त केले.

 

 

Exit mobile version