Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संविधान बचाव नागरी कृती समितीतर्फे गृहमंत्र्‍यांना निवेदन

भुसावळ प्रतिनिधी । संविधान बचाव नागरी कृती समितीतर्फे आज २८ फेब्रुवारी शुक्रवार रोजी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मागण्‍यांचे निवेदन देण्‍यात आले.

यात भुसावळ येथे पोलिसांनी २९ जानेवारी रोजी झालेल्या बंदच्‍या पार्श्वभूमीवर झालेल्या दगडफेकीत निष्पाप लोकांना दबावात घेणे ,रात्री बे रात्री आरोपी असल्याच्या नावाने कोणाच्या तरी दबावाला बळी पडून सतत कार्यवाही केली जात आहे . संविधान बचाव नागरी कृती समितीच्या भुसावळ शाखेने वेळोवेळी पोलिसांसोबत चर्चा करत न्याय मागण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलीस प्रशासनातर्फे कुठलाही सकारात्मक प्रतिसाद दिला जात नव्हता.उलट कुठलीही गंभीर जखम नसतांना ३०७ व ३५३ सारखे कलम लावून निष्पाप मुलांना आरोपी करण्यात आले आहे.या अन्‍याया विरुध्द गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांच्या कडे जावून निवेदन देण्‍यात आले असून यावेळी राष्ट्रवादीच्या आ. विद्या चव्हाण,समाजवादी पार्टीचे आ.अबु आसीम आझमी,लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, संविधान बचाव नागरी कृती समितीचे इमरान खान हे उपस्थित होते. ना.अनिल देशमुख यांनी पोलिस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून न्याय देण्याचे आश्वासन शिष्‍टमंडळाला दिले.

Exit mobile version