Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संविधान दिन हा राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हावा – अनोमदर्शी तायडे

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “भारतीय संविधान दिनानिमित्त” ‘रिस्पेक्ट युथ फाउंडेशन’ तर्फे आयोजित ‘समतापथिक प्रज्ञा परीक्षा २०२२’ चा निकाल घोषित करण्यात आला. यंदाचे या परीक्षेचे हे चौथे वर्ष होते. आ. गं. हायस्कूल या परीक्षा केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील विविध मान्यवरांच्या हस्ते यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत अनोमदर्शी तायडे सर यांनी आपल्याला स्वाभिमान आणि आत्मसन्मानाचे जीवन जगण्याचा अधिकार देणाऱ्या भारतीय संविधान विषयी प्रत्येक भारतीयाच्या मनात जनजागृती व्हावी, उद्याची येणारी पिढी, उद्याच्या नागरिक केवळ पोट भरू माणूस न घडता एक सक्षम नागरिक घडवणे व त्यातून समर्थ भारत उभा करणे, किशोरांपासून ते युवकांपर्यंत मानवमुक्तीचा हा जाहीरनामा पोहोचणे, संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले हक्क अधिकार यासोबतच कर्तव्याची जाण प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे या उद्देशाला अनुसरून “समतापथिक संविधान प्रज्ञा परीक्षा” आयोजित केली जाते असे मत मांडले.

यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सचिव व निंभोरासिम गावचे उपसरपंच राजुभाऊ सवर्णे, प्रमुख पाहुणे म्हणून वढोदा ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच नंदकिशोर सोनवणे, सामाजिक समता मंच चे कार्याध्यक्ष उमेश गाढे, स्वप्निल तायडे,( शाखा व्यवस्थापक जे डी सी सी बँक ), श्रीहरी कांबळे, (तलाठी रायपुर) रितेश दादा परदेशी,ॲड. राजकुमार लोखंडे, कल्पेश खत्री, सचिन झाल्टे, आदी मान्यवर उपस्थित होते. परीक्षार्थी मधून लहान गटातून- प्रथम क्रमांक- अक्षदा नितीन कुमावत, द्वितीय क्रमांक- कामिनी प्रभाकर लोखंडे, दिशा सतीश बोदडे (यांना विभागून) तृतीय क्रमांक- संचेती आनंद तायडे या विद्यार्थिनींचा आला. मोठा गटातून प्रथम क्रमांक- अमोल विनोद इंगळे, द्वितीय क्रमांक- सुशील वसंत लहासे, तृतीय क्रमांक- कुणाल सुनील तायडे यांचा आला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसाची रक्कम, प्रमाणपत्र व संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत देण्यात आली.

आपल्या मनोगतात उपस्थीत सर्वच मान्यवरांनी रिस्पेक्ट युथ फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली. कोणत्याही प्रकारच्या पदाचा समावेश नसलेले, आपण सर्व एक आहोत ही भावना सोबत घेऊन रिस्पेक्ट युथ फाउंडेशन परिसरामध्ये उत्तम कामगिरी करत आहे. रिस्पेक्ट युथ फाऊंडेशनच्या या उपक्रमाचा फायदा परिसरातील अधिकारी होवू पाहणाऱ्या प्रत्येक युवकाला होत आहे. प्रज्ञा परीक्षेच्या माध्यमातून सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाची कल्पना परिसरातील तरुणांना येते व त्यांना तयारीला लागता येते असे मत उमेश गाढे यांनी मांडले.

तर जेमतेम परिस्थिती असून सुद्धा रिस्पेक्ट युथ फाऊंडेशनचा प्रत्येक सदस्य हा वर्षभरामध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून परिसरातील युवकांमध्ये स्फूर्ती पसरवण्याचे काम करत आहे, लहान वयोगटापासून ते पदव्युत्तर वर्गापर्यंत प्रत्येक प्रकारचा सदस्य असलेला रिस्पेक्ट युथ फाउंडेशन भविष्यात सुद्धा परिसरातील तरुणांसाठी अशाच उपक्रमांचे आयोजन करत राहो अशी सदिच्छा ऍड. राजकुमार लोखंडे यांनी दिली.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसताना सुद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने सामाजिक समतेसाठी आयुष्य घालवले त्यांना डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक व्यक्तीने जीवनाची योग्य दिशा गाठणे गरजेचे आहे असे मत नंदकिशोर सोनवणे यांनी मांडले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लहानपणापासूनच जातीयतेचे चटके सोसत, विविध अडचणींना तोंड देत मोठ्या परिश्रमाने आपल्या ज्ञानाच्या जोरावर कोणालाही शक्य नाही अशी जी उंची गाठली ती प्रत्येकाला प्रेरणादायी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील भेदभाव विरहित समाज निर्माण करणे ही प्रत्येक तरुणाची भूमिका असली पाहिजे असे मत रितेश परदेशी यांनी व्यक्त केले.

आपल्या मनोगतात कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी रिस्पेक्ट युथ फाउंडेशन च्या सदस्यांमार्फत परिसरामध्ये विविध उपक्रम नेहमीच राबवले जात असून या उपक्रमांच्या माध्यमातून विविध प्रकारची जनजागृती, महापुरुषांचे विचार, सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठीचे प्रयत्न, बंधुभाव जोपासणे, गरजू व्यक्तींपर्यंत मदत, मार्गदर्शन पोहोचवण्याचे जे कार्य केले जात आहे ते नक्कीच प्रशंसनीय असून या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला सच्चा भारतीय नागरिक घडवण्यासाठी नक्कीच मदत होत आहे असे मत व्यक्त केले गेले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन करण्यात आली.तर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून व २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज बोदडे सर आणि सिद्धार्थ तायडे यांनी केले तर आभार आनंद वाघोदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिस्पेक्ट युथ फाऊंडेशनचे ॲड. सचिन तायडे, कुंदन तायडे, विक्रम तायडे, दीपक बोदडे, प्रदीप तायडे, शिरीष वाघोदे, अक्षय वाघोदे, चेतन लोखंडे,राहुल वाघ, विकास लोखंडे, योगेश पूर्भी, करण साळुंखे, सचिन लोखंडे, संजय लोखंडे आदी, सदस्यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version