Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संमतीशिवाय फोटो , पदकाचा वापर ; पीव्ही सिंधू ठोकणार दावा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । परवानगी न घेता  नाव आणि फोटोचा वापर पोस्ट्स व जाहिरातींमध्ये केला म्हणून ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी व्ही  सिंधू  काही ब्रँड्स विरुद्ध दावा ठोकण्याच्या तयारीत आहे.

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. ऑलिम्पिक स्पर्धेतील तिचं हे दुसरं पदक आहे. यापूर्वी रियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिने रौप्य पदक पटकावलं होतं. ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटन स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी ती एकमेव खेळाडू आहे. तिच्या कामगिरीनंतर संपूर्ण देशातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. यात काही ब्रँडचाही समावेश होता. या ब्रँडने सोशल मीडियावर सिंधूचं नाव आणि फोटोचा वापर करून पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केलं. मात्र हे करत असाताना ब्रँडचा प्रसार करण्याचा हेतू स्पष्ट दिसत होता.

 

सोशल मीडियावरील या पोस्टमुळे सामन्य लोकांना पीव्ही सिंधू आणि ब्रँडदरम्यान काही करार असल्याचं समज झाला  आहे. पीव्ही सिंधू या ब्रँडचा प्रसार करत असल्याचं लोकांना वाटत आहे. याला मुव्हमेंट मार्केटिंग बोललं जातं. यापूर्वी अनेक ब्रँडने अशा प्रकारे वापर केल्याचं निदर्शनास आलं आहे. मात्र एका सेलिब्रेटीच्या परवानगीशिवाय त्याच्या नावाने सोशल मीडियावर पोस्ट टाकणे, हे भारतीय नियमानुसार अनफेयर ट्रेड प्रॅक्टिस आहे. यात दोषी आढळल्यास दंडाची तरतूद आहे.

 

पीव्ही सिंधू नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी २० ब्रँडविरोधात कोर्टाचं दार ठोठावणार आहे. यापैकी १५ ब्रँडला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. फोर्ब्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, वोडाफोन आयडिया, एमजी मोटर, यूको बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्र बँक, फिनो पेमेंट्स बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि विप्रो लायटिंगसारख्या ब्रँडना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर हॅपीडेंट, पान बहार आणि यूरेकासारख्या ब्रँडना कोर्टात खेचण्याची तयारी सुरु केली आहे.

 

Exit mobile version