Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संभाजी बिडी नावावर रोहित पवारांची हरकत

पुणे वृत्तसंस्था । छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील एका बिडी कंपनीकडे केली आहे. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही मागणी केली आहे.

रोहित पवार म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करतेय. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे. लोकभावनेचा विचार करुन संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा.”

रोहित पवारांनी केलेल्या या मागणीला ट्विटरवर अनेकांनी पाठिंबा दर्शवला असून अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रकारावर आवाज उठवल्याप्रकरणी त्यांचे एकाने अभिनंदन केले आहे.

Exit mobile version