Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संभाजी नगरात एक जण पहाटे तीन वाजता घरात घुसला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील संभाजी नगरातील एका घरात अज्ञात चोरटा चोरीच्या उद्देशाने आला होता. परंतू घरातील व्यक्ती उठल्याचे पाहून पसार झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात रविवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रज्ञाशिल दलपतराव तायडे (वय-४५) रा. संभाजी नगर,गाडगेबाबा चौक जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी १९ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असतांना अज्ञात व्यक्ती घरात चोरी करण्याच्या इराद्याने घुसला होता. त्याच्या हालचालीवरून घरातील व्यक्ती उठले, त्याची चाहूल चोरट्याला लागताच त्याने घरातून काढता पाय घेतला. दरम्यान, या घटनेबाबत प्रज्ञाशिल तायडे यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात रविवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अजित पाटील करीत आहे.

Exit mobile version