Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संभाजीराजेना चुकीचे ठरवले जात आहे- फडणवीस

नागपूर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | छत्रपती संभाजीराजे यांनी भेटीपूर्वी आणि भेटीदरम्यान अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले होते. संभाजीराजेंचे नेतृत्व गेल्या सहा वर्षात तयार असून त्यांच्या अपक्ष निवडून येण्याने मराठा आणि बहूजन समाजात नवीन नेतृत्त्व तयार झाले असते. परंतु त्यांना चुकीचे ठरवले जात असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

शाहू महाराज आमचे छत्रपती असून त्या गादीचा मोठा मान आहे. शाहू महाराजांनी केलेल्या वक्तव्यावर कोणतेही भाष्य किंवा मत व्यक्त करणे चुकीचे आहे. काही चुकीच्या व्यक्तींनी महाराजांना चुकीची माहिती देत संभाजीराजेना चुकीचे ठरवले जात असून महाराज आणि युवराज यांच्यात अंतर असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

फटका कोणाला बसणार हे प्रत्येकाला माहित

शिवाय छत्रपती संभाजीराजेंनी ट्विट करीत शिवाजी महाराजांना स्मरुन जे बोललो ते खरे आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे ती स्पष्ट आहे. संभाजीराजेंचे नेतृत्त्व गेल्या सहा वर्षात तयार झाले असून त्यांच्या भेटीदरम्यान म्हणण्यानुसार ते अपक्ष निवडून आले असते तर, बहुजनांसह मराठा नेतृत्व तयार झाले असते. आणि त्यांच्या निवडून येण्याने भाजपचे कोणतेही नुकसान झाले नसत, मात्र कोणाचे नुकसान होऊन याचा फटका कोणाला बसणार हे राजकारण कळणाऱ्या प्रत्येकाला माहित आहे, असे म्हणत फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख करीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे देखील अप्रत्यक्षपणे बोट दाखवले आहे.

Exit mobile version