Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संभाजीराजेंना मंचाखाली बसवल्याने ‘सारथी’च्या सभेत मोठा गोंधळ !

मुंबई (वृत्तसंस्था) छत्रपती संभाजीराजे यांना व्यासपीठाखाली बसवल्यामुळे मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या बैठकीत मोठा गोंधळ उडाला. छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान दिले जात असेल तर आम्ही बाहेर काय तोंड दाखवणार, असा प्रश्न उपस्थित करत मराठा समाज समन्वयकांनी गोंधळ घातला.

 

संभाजी राजे यांनी आपण सामान्य जनतेचा प्रतिनिधी असल्याचे सांगत तिसऱ्या रांगेत बसण्याची तयारी दर्शवली. गोंधळ घालू नका. आपल्याला समाज महत्वाचा आहे. समाजासाठी आपण मान अपमान न मानता बैठक करू. निर्णय महत्वाचा आहे. सारथी महत्वाची आहे, असे आवाहन त्यांनी मराठा समाज समन्वयकांना केले. त्यानंतर अजित पवारांनी चूक सुधारत राजेंना वरती येण्याचा आग्रह केला. तर सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची? सारथीमध्ये पगार नाही, मानधन नाही असे किमान पाचशे जण आहेत. त्यांना आधी रोजगार द्या मग, महाजॉब्ससारखी पोर्टल सुरु करा, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. दरम्यान, आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेबद्दल महत्त्वाची बैठक बोलावली होती. सारथी संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला राज्य सरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते.

Exit mobile version