Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संभाजीराजेंच्या राजीनाम्याच्या इशाऱ्याचे गांभीर्य नाही – चंद्रकांत पाटील

 

मुंबई : वृत्तसंस्था । खासदार छत्रपती संभाजीराजेंनी राजीनामा दिल्याने कुणावर परिणाम होणार आहे? महाराष्ट्रातील सरकार  कोडगं आहे. संभाजीराजेंवर हेरगिरी सुरू आहे, त्याचा मी निषेध करतो,” असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे

 

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे.  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे भाजपाला दूर ठेवत असल्याचं आणि भाजपाकडून त्यांच्यावर टीका होत असल्याचं दिसत आहे. संभाजीराजेंनी खासदाराकीचा राजीनामा देण्याचाही इशारा दिलेला आहे. संभाजीराजेंच्या राजीनाम्याच्या इशाऱ्यावर   भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली.

 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.  त्यांनी मराठा-ओबीसी आक्षरण, संभाजीराजेंची भूमिका, देवेंद्र फडणवीस-शरद पवार यांच्या भेटीसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारला कृती कार्यक्रमासाठी ६ जूनपर्यंतची मुदत देतानाच खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला.

 

“आमदार महेश लांडगे यांनी मुलीच्या लग्नात मिरवणूक काढली. गर्दी जमवली, हे चुकीचे आहे. महेश लांडगे यांना समज देण्यात येईल,” असं सांगत पाटील म्हणाले, “ओबीसी आरक्षणाच्या निर्णयात केंद्र सरकारचा काय संबध आहे. राज्य सरकारने दीड वर्षांपासून मागासवर्गीय आयोग नेमला नाही, त्यांनी तो आधी नेमावा. असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

 

 

Exit mobile version