Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संपकऱ्यांविरुद्ध कारवाई ? महामंडळ अक्शन मोडवर

जळगाव /मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्युजवृतसेवा – जिल्ह्यासह राज्यात गेल्या नोव्हेंबरपासून एसटी कर्मचाऱ्याचा संप सुरु आहे. परिवहन महामंडळ, मंत्री अनिल परब, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी ईशारा, प्रसंगी ३१ मार्च पूर्वी कामावर हजर व्हा, असे आवाहन करूनही बरेचसे कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. शिवाय आज न्यायालयात सुनावणी आहे. निर्णय काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वारंवार आवाहन करूनही संपकरी संपाबाबत ठाम आहेत, त्यामुळे महामंडळ अक्शन मोडवर असून संपकऱ्यांविरुद्ध कारवाई अटळ असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात ऑक्टोबरच्या शेवटच्या सप्ताहात तर जिल्ह्यात ७ नोव्हेंबर पासून एसटी कर्मचाऱ्याचा विलीनीकरण तसेच संसर्ग वा अन्य कारणामुळे मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना मदत किंवा संपसंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्य सरकारने वेळोवेळी तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान न्यायालायात सुनावणी दरम्यान १५ दिवसाचा अवधी मागून घेतला आहे. त्यानुसार आज ५ एप्रिल रोजी न्यायालयात सुनावणी होणार असून काय निर्णय येतो याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार जानेवारीच्या सुरवातीस जिल्हा दौऱ्यावर आले असता जास्त अंत पाहू नका, किंवा तुटेपर्यंत ताणू नका असा इशारा दिला होता. तसेच प्रशासन, परिवहन मंत्री अनिल परब यांनी वेळोवेळी आवाहन केले असले तरी बरेचसे कर्मचारी संपावर ठाम आहेत.

आतापर्यंतची स्थिती
जळगाव विभागात वाहन चालक, वाहक, यांत्रिकी विभाग आणि प्रशासन असे सुमारे४ हजार ५०० च्यावर कर्मचारी कार्यरत होते, त्यापैकी सुमारे ११०० च्यावर कर्मचाऱ्यावर बडतर्फी, सेवासमाप्ती, निलंबन, कारणे दाखवा नोटीस आदि कारवाया करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version