Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संत सावता महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त पालकमंत्र्यांनी केले अभिवादन

पाळधी ता.धरणगाव (प्रतिनिधी) । श्री संत सावता महाराजांची ७२५ व्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त पाळधी येथील श्री संत सावता महाराज मंदिर येथे सावता महाराजांच्या मूर्तीचे सोशल डिस्टन्सिंग ठेवून पालकमंत्री जळगाव जिल्हा ना गुलाबराव पाटील यांच्याहस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.

अभिवादन करतांना सरपंच चंदू माळी, पाळधी नगरीचे प्रसिद्ध उद्योगपती दिलीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य जीतू पाटील, दिगंबर माळी, संपादक भूषण महाजन, पत्रकार गोपाळ सोनवणे यांच्यासह सर्व समाजबांधव उपस्थित होते.

Exit mobile version