Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संत सखाराम महाराज दिंडी परंपरेच्या मठासाठी आमदारांना निवेदन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आदिशक्ती मुक्ताईच्या वारीला संत सखाराम महाराज दिंडी परंपरेच्या मठासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी सभागृह मंजूर करून देण्याचे अश्वासन वारकऱ्यांना दिले आहे.

आदिशक्ति मुक्ताईच्या वारीला दशमी, एकादशी व द्वादशी असे तीन दिवसांसाठी मुक्कामी येत असलेल्या संत सखाराम महाराज यांचा परंपरेचा दिंडी सोहळ्याला शंभर वर्षा पासूनची अखंड परंपरा आहे. सोहळ्यात जळगाव जिल्ह्यासह, विदर्भ व खान्देशातील हजारो वारकरी व भाविक सहभागी होत असतात. तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर (कोथळी) येथील आदिशक्ती मुक्ताई मंदिराच्या सानिध्यात या संत परंपरेचा पूर्वीपासून मठ होता. परंतु मंदिर विकास आराखड्यात येथील परिसराचे निर्लेखन झाले त्यात या मठाची जागा गेली. तेव्हापासून या दिंडी सोहळयात येणाऱ्या आबाल, वृद्ध वारकरी उघड्यावर फड टाकत असल्याने वारकऱ्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत असतो या करिता येथे जागा तसेच मठा साठी सभागृह बांधून मिळावे अशी मागणीचे साकडे दिंडी परंपरेच्या पंच मंडळातर्फे आमदार चंद्रकांत पाटील यांना लेखी पत्राद्वारे घालण्यात आले.

याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी लागलीच सर्व पंच मंडळ यांना सोबत घेवून तिर्थक्षेत्र मुक्ताई मंदिर परिसर गाठून सदग्रुरू सखाराम महाराज मठाची नियोजित जागा पाहणी केली व या ठिकाणी लागलीच निधीची उपलब्धता करून सभागृह मंजूर करून देतो असे सर्वांना आश्वस्थ केले. प्रसंगी सदगुरु सखाराम महाराज दिंडी परंपरेचे गादिपती विश्वंभर महाराज, अध्यक्ष विनायकराव पाटील (पांढर साकळे), उपाध्यक्ष अशोकराव पाटील (काकसाडा), विश्वस्त प्रकाश पाटील (बाभूळगाव), कोषाध्यक्ष ॲड. वीरेंद्र झाडोकार यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, कोथळी उपसरपंच पंकज राणे, नगरसेवक संतोष मराठे,गोपाळ सोनवणे,राजेंद्र तळेले, प्रमोद सोनार,गणेश सोनवणे, स्वीय सहायक प्रवीण चौधरी आदींसह इतर असंख्य भाविक मंडळी उपस्थित होते.

Exit mobile version