Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अहिरे सुवर्णकार मंडळ, अहिर सुवर्णकार नवयुवक मंडळ व अहिर सुवर्णकार महिला मंडळाच्या वतीने बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७०८ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.

सकाळी ८:३० वाजता शहरातील अहिर सुवर्णकार मंडळ कार्यालयापासुन महाराजांच्या प्रतिमेची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. सदरची पालखी मिरवणूक देखमुखवाडी, हिंद आॅईल मिल रोड, जामनेर रोड, गांधी चौक, सराफ बाजार, विठ्ठल मंदिर रोड ते पुन्हा देशमुखवाडी मधील अहिर सुवर्णकार मंडळ कार्यालयात आणण्यात आली. या पालखी सोहळ्या प्रसंगी समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण बघावसाय मिळाले. या पालखी सोहळ्यात अहिर सुवर्णकार मंडळाचे अध्यक्ष विष्णु सोनार, उपाध्यक्ष रविंद्र सराफ, सचिव कालिदास सोनार (राजु बाळदकर), अहिर सुवर्णकार नवयुवक मंडळाचे अध्यक्ष भुवनेश दुसाने, सचिव रोहित जडे, अहिर सुवर्णकार महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनिता देवरे, सचिव वैशाली जडे, राजाराम सोनार, प्रमोद सोनार, मनिष बाविस्कर यांचेसह परिसरातील समाज बांधव, भगिणी, युवक, युवती, बाल गोपाल यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती. दुपारी १२:३० वाजता अहिर सुवर्णकार मंडळ कार्यालयात पालखीची महाआरती करुन पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली. एकंदरीतच खेळीमेळीच्या वातावरणात संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

Exit mobile version