Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्डचे संचालक मंडळ घोषित करून कामकाज त्वरित सुरु करा (व्हिडिओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्डचे संचालक मंडळ घोषित करून कामकाज त्वरित सुरु करण्यात यावा अशी मागणी अखिल लाड (प्रजापती) कुंभार समाज संस्थेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात अली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, अडीच वर्षापासून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून कुंभार समाजाच्या एकाही प्रलंबित मागणीबाबत या सरकारनी सकारात्मक निर्णय केलेला नाहीच किंबहुना सकल कुंभार समाजाच्या मागण्यांबाबत समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत अधिकृतरित्या एकही मिटींग शासन स्तरावर झालेली नाही. कुंभार समाजाच्या हजारों कार्यकर्त्यांच्या संघर्षातून देवेंद्र फडणवीस सरकारनी कुंभार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने श्री संत शिरोमणी गोरोबा काका मातीकला बोर्डची घोषणा करून रूपये १० कोटी निधिची तरतूद सुध्दा केली. दिनांक ८ मार्च २०१९ अन्वये मातीकला बोर्ड स्थापनेचा शासन निर्णय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांनाच निर्गमीत झालेला आहे. परंतु या महाविकास आघाडी सरकारनी या संदर्भात एक मिटिंग सुध्दा बोलाविली नाही, आणि बजट मध्ये मातीकला बोर्डला एक रूपयाचे अनुदान सुध्दा जाहीर केलेले नाही. तसेच प्रमुख उपस्थित एक मिटिंग बोलावून समाजाला न्याय देण्याकरिता पुढाकार घ्यावा. अन्यथा राज्यातील सकल कुंभार समाज महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा देण्यात आला आहे.

प्रलंबित मागण्या पुढीलप्रमाणे – महाराष्ट्र शासनाने कुंभार समाजाचा एन. टी. प्रवर्गात समावेश करावा., संत गोरोबा काका ह्यांचे जन्मस्थान तेर ढोकी, जि. उस्मानाबाद या तिर्थक्षेत्रास देहु आणि आळंदी प्रमाणे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात यावे., कुंभार समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधीत्व मिळावे. कुंभार समाजाला मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी संपूर्णतः माफ केली जावी., माती वाहतूक आणि वीट भट्टी परवान्याच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात.आणि कुंभार समाजास ओळखपत्रावर परवाना मिळावा. कुंभार समाजासाठी राखीव असणाऱ्या आणि अतिक्रमण झालेल्या कुंभार खाणी त्वरीत कुंभार समाजास हस्तांतरीत कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या.निवेदनावर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कपडे, सखाराम मोरे, विलास कुंभार, सुभाष पंडित आदींची स्वाक्षरी आहे.

 

 

Exit mobile version