Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संत मुक्ताबाई संस्थानचा यावर्षीचा वार्षिक कीर्तन महोत्सव कोरोनामुळे रद्द

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील कोथडी येथील संत मुक्ताबाई संस्थानच्या वतीने यावर्षी 17 ते 24 फेब्रुवारी 2019 यादरम्यान साजरा होणारा देगलूरकर कीर्तन सप्ताह महोत्सव कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आला आहे.

श्री संत मुक्ताबाई संस्थान कोथळी मुक्ताईनगर समाधीस्थळावर दरवर्षी वारकरी संप्रदायातील प्रख्यात ज्येष्ठ कीर्तनकार वारकरी यांचे सहभागातून राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन संत मुक्ताबाई संस्थान करीत असते या महोत्सवात राज्यातील हजारो भाविक उपस्थित असतात. ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन प्रवचन भजनास नामवंत गुणीजन सेवा देतात तर या वर्षी 17 ते 24 फेब्रुवारी पर्यंत देगलूरकर फडाचे सहभागातून हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर यांचे ताटीचे अभंग निरूपण ज्ञानेश्वरी पारायण व ह-भ-प जयवंत महाराज बोधले हभप. प्रमोद अण्णा जगताप माधवदास महाराज मराठी चंद्रशेखर महाराज देगलूरकर हभप.महादेव महाराज राऊत यांचे कीर्तने आयोजित केली होती. आठ दिवस भाविकांना भरगच्च अध्यात्मिक मेजवानीच ठरणार होती परंतु करुणा मारीचे पार्श्वभूमीवर संस्थांचे अध्यक्ष एडवोकेट. भैय्यासाहेब रवींद्र पाटील व ह भ प रविंद्र महाराज हरणे विनायकराव पाटील उद्धव महाराज देणारे विलास संत यांनी पंढरपूर येथे ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली या वर्षीचा कार्यक्रम रद्द करून पुढील वर्षात 2022 मध्ये सप्ताह महोत्सव करण्याचे ठरले आहे संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सप्तशती रोप्यमहोत्सव वर्षाचा भव्यदिव्य कार्यक्रम साजरा होणार असल्याने भाविकांना या क्षणाची वर्षभर वाट पाहावी लागणार आहे.

Exit mobile version