Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत यश

 

जळगाव, प्रतिनिधी । नुकतीच जळगावात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय संचलित, कराटे शिबिरात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. त्याबद्दल त्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

स्पर्धेत सुवर्ण पदक प्रणिता कडू साळुंके, सकलेन लतीफुद्दीन पिरजादे, अहेतेसब लतीफुद्दीन पिरजादे, साई दत्तू माळी यांना मिळाले. तसेच, रौप्य पदक ऋषिकेश संजय मांडोळे, दीपाली मधुकर सावकारे, सैफ लतीफुद्दीन पिरजादे या विद्यार्थ्यांनी पटकावले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संत ज्ञानेश्वर महाराज कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक व सचिव मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन केला. यावेळी प्रशांत नाईक यांनी, मेहनत करा व विद्यालयाचे, आई-वडिलांचे नावलौकिक करा असे मनोगतातुन सांगितले. विद्यार्थ्यांना, मुख्य कराटे प्रशिक्षक – ज्ञानेश्वर पवार यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. सहाय्यक कराटे प्रशिक्षिका प्रज्ञा बोदडे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

Exit mobile version