Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संतापजनक : राजस्थानमध्ये विधवा महिलेवर बलात्कार !


चुरू (वृत्तसंस्था)
राजस्थानच्या चुरू येथे एका ३२ वर्षीय विधवा महिलेवर गावातीलच काही गुंडांनी अपहरण करून बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

 

 

पतीचा मृत्यू झाल्यानंतर पिडीत महिला आपल्या वडिलांसोबत राहत होती. १५ दिवसांपूर्वी वडील आजारी असल्यामुळे त्यांच्यासाठी औषध आणण्यासाठी ती मेडिकलवर जात होती. त्याचवेळी आरोपी देवीलाल याने तिला जबरदस्ती गाडीत बसवले आणि सरदार शहर रस्त्यालगत असलेल्या एका घरात तिला नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी तिला पल्लू येथे घेऊन गेला आणि जीवेठार मारण्याची धमकी देत १० दिवस डांबून ठेवत तिच्यावर बलात्कार केला. आरोपीचे नातेवाइक चहामध्ये नशेच्या गोळ्या टाकून तिला बेशुद्ध करत होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेत आहेत.

Exit mobile version