Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संतापजनक : बापाकडूनच अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बुलडाणा (वृत्तसंस्था) दारुच्या आहारी गेलेल्या बापाने आपल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे घडली.

पिंपळगाव राजा येथून जवळच असलेल्या एका गावात आरोपी आपल्या नातेवाईकांकडे गेल्या काही दिवसांपासून परिवारासह मुक्कामी होता. दरम्यान त्याची पत्नी शेतात कामाला गेली असता घरात असलेल्या १६ वर्षीय मुलीसोबत अनैतिक कृत्य करण्याचा प्रयत्न त्याने केला. यावेळी तिने प्रतिकार केला असता तिला आणि तिच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी त्या आरोपी बापाने दिली. दरम्यान, भेदरलेल्या मुलीने पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात आपली फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपी बापावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

Exit mobile version