Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संतापजनक : पोटच्या दोन मुलींवर बापाकडून बलात्कार !

बीड (वृत्तसंस्था) आपल्या पोटाच्या दोन मुलींवर बलात्कार करून तिसऱ्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचा संतापजनक प्रकार केज तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

केज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात वास्तव्यास असलेला व्यक्ती एका नामांकित शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक आहे. काही वर्षांपूर्वी त्याने स्वतःच्या दोन मुलींवर बलात्कार केला होता. यातील एक पीडिता आता २० वर्षे तर दुसरी १८ वर्षांची आहे. आता १७ वर्षांच्या सर्वात लहान मुलीशी आरोपी लगट करून तिचाही विनयभंग करत होता. अखेर हा प्रकार असह्य झाल्याने या मुलींनी हा प्रकार कुटुंबीयांना सांगत पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी मुख्याध्यापक बापावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version